0


फाळणीचा निर्णय योग्य होता, हे भारताचे पतंप्रधान नरेंद् मोदी यांच्या सरकारने सिद्ध करून दाखविले आहे, अशी टीका पाकिस्तानचे नेता, माजी क्रिक्रेटर इम्रान खान यांनी केली आहे.

भारत- पाकिस्तानच्या फाळणीला सत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान बोलत होते. त्यांनी सांगितले की भारत-पाकिस्तान यांच्यातील सर्वात वाईट दिवस सध्या सुरू आहेत. याला कारण नरेंद्र मोदी आहेत. मोदी हे धर्मवादी असून ते कट्टर हिंदू धर्माच्या विचारसरणीचे आहेत. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांची मुस्लिमविरोधी प्रतिमा समोर आली होती.
खान म्हणाले की आम्हाला वाटले होते की मोदी जेव्हा पंतप्रधान होतील तेव्हा त्यांचे धर्मनिष्ठ विचार बाजूला जातील, पण तसे झाले नाही. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तेही भाजपचेच होते, पण तेव्हा कुठल्याही प्रकारचा फारसा तणाव नव्हता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात भारत-पाकिस्तान यांच्यात शांतीचे वातावरण होते. मोदी हे मोठा जनाधार घेऊन सत्तेत आले आहेत. दोन्ही देशात सुसंवादाचे वातावरण निर्माण होऊ शकले असते. पण आमची निराशा झाली, असेही खान यांनी नमूद केले.

Post a Comment

 
Top