0


झी मराठीवरील ‘जय मल्हार लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला आपल्या सर्वांचा लाडका खंडोबा म्हणजे देवदत्त नागे आता प्रेक्षकांसमोर आपला नवा चित्रपट घेऊन येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले असून या चित्रपटाचे नाव ‘चेंबूर नाका’ असे आहे.

साक्षी व्हिजन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनणाऱ्या डॉ. सीमा नितनवरे आणि देवदत्त नागे यांची निर्मिती असलेल्या ‘चेंबूर नाका’ या आगामी मराठी चित्रपटात देवदत्त एका नव्या रूपात मराठी रसिकांना दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश पवार यांनी केले आहे. नुकतेच जे.के. बेक्वेट्स, प्रभादेवी येथे केंद्रिय सामाजिक व न्याय मंत्री मा. खा. श्री. रामदासजी आठवले, गोस्वामी श्री नीरजकुमारजी महाराज, सुवर्णाताई डंबाळे आणि उपस्थित पत्रकारांच्या शुभहस्ते ‘चेंबूर नाका’ या चित्रपटाच्या पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी तसेच मराठी व हिंदीचित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होती
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment

 
Top