0


मुंबई -भारतात अब्जावधींचे कर्ज बुडवून ब्रिटनला स्थायिक झालेल्या कर्जबुडव्या विजय माल्ल्याला भारतात आणल्यानंतर विजय माल्ल्याला कुठे ठेवणार आणि त्या तुरुंगात काय व्यवस्था आहे, याचा तपशील भारताने लंडनच्या न्यायालयात दिला आहे. त्यानुसार, २६/११ हल्ल्याचा एकमेव जीवंत पकडलेला आणि नंतर फाशी देण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब आर्थर रोड तुरुंगातील ज्या बॅरकमध्ये होता, त्याच बॅरकमध्ये माल्ल्याला ठेवले जाणार आहे

भारतात विजय माल्ल्याला आणण्यासाठी मुत्सद्दी आणि न्यायलयीन लढा सुरू आहे. त्याच अंतर्गत लंडनच्या एका न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी भारताने विजय माल्ल्याला कोणत्या तुरुंगात आणि कशा प्रकारे ठेवणार याची माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी न्यायालयात याबाबतचा अहवाल सोमवारी लंडनच्या न्यायालयात दाखल केला आहे. जुलै महिन्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयने लंडन न्यायालयात माल्ल्याविरोधातील महत्वाचे पुरावे सादर केले होते. यामध्ये जून महिन्यात ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटचाही उल्लेख होता.
Next
Newer Post
Previous
This is the last post.

Post a Comment

 
Top